Dainik Maval News : शाळांतील काही शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या बेकायदेशीर खासगी शिकवणी वर्गांवर प्रतिबंध घालून कडक कारवाई करण्याची मागणी तळेगाव शहर युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शालेय अंतर्गत २० गुणांचा अधिकार असलेल्या काही शिक्षकांकडून खासगी शिकवणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना गुरुवारी (दि. १५) निवेदन दिले.
उपमुख्याधिकारी ममता राठोड यांना निवेदनाची प्रत देताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज, तालुका सरचिटणीस राजीव फलके, संपर्कप्रमुख राजू शिंदे, किरण मोकाशी, स्वप्निल निकाळजे आदी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा
– तळेगाव शहरातील कटारिया कुटुंबाचा समाजास