मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पंढरपूरच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते, त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ( Warkari devotees going to Pandharpur Ashadhi Wari waived toll along with return journey )
पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे, यासाठी विशेष सुविधा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत 5 वरून दहा कोटी तसेच वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकरिता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. हा निधी तत्काळ वितरीत करण्याची सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
अधिक वाचा –
– मावळमधील कुसवली येथील ‘सहारा’ वृद्धाश्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार
– पावसाळ्यापूर्वी शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील