मावळ तालुका वारकरी मंडळाची स्थापना आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच खंडोबा देवस्थान कडधे येथे मंडळाचे संस्थापक हभप नारायण महाराज केंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हभप पांडुरंग महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर करण्यात आल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या समस्या आणि नवीन पिढीत देव, देश आणि धर्माची आवड निर्माण करण्यासाठी मावळ तालुका वारकरी मंडळाची स्थापना करण्यात आली असून गाव तेथे वारकरी मंडळाची शाखा उभारून भरकटत असलेल्या तरुणाईत भजन कीर्तनाची गोडी निर्माण करून युवापिढी वाम मार्गाला न जाता सांप्रदायिक क्षेत्राकडे वळवण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे दिनकरबुवा निंबळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ( maval taluka warkari mandal new executive announced )
कार्यकारीणी – भरत वरघडे गुरुजी (अध्यक्ष) भाऊ आंभोरे (उपाध्यक्ष) नारायण केंडे (संस्थापक) पाडुरंग गायकवाड (मार्गदर्शक) दिनकर निंबळे(सचिव) भाऊ काटे (सहसचिव) बाळासाहेब गायकवाड (कार्याध्यक्ष) शंकर लोहोर (सहकोषाध्यक्ष) विश्वनाथ वाळुंजकर (सहसंघटक) बळीराम ढोले (संपर्क प्रमुख) सचिन ठाकर (प्रसिद्धी प्रमुख) त्याचप्रमाणे नंदाराम जाधव, अंकुश कराळे, बाजीराव ढोरे, विकास ठुले, संजय ढोरे, शिवाजी ढोले, बाळकृष्ण तुपे आदींसह ३५ जणांची निवड करण्यात आली.
महिला कार्यकारीणी – सारीका निकम(अध्यक्ष) कोमल घारे (उपाध्यक्ष),सुरेखा काकरे(सचिव), छाया काकरे,सुषमा ओझरकर,मालन ढोरे, रूपाली तुपे, सुमन घरदाळे,कमल काकरे, सखु तिकोणे,मंगल जाधव, लक्ष्मी पऱ्हाड, सरस्वती जाधव, अनुसया म्हस्के, चंद्रभागा जांभुळकर आदी महिलांचाही कार्यकारिणीत समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ काटे यांनी तर आभार बाळासाहेब गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमा वेळी तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने हजर होते.
अधिक वाचा –
– “पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत”
– रणरणत्या उन्हात ‘सावित्रीं’चे वटवृक्षाला फेरे, मावळ तालुक्यात महिला वर्गाकडून वटपौर्णिमा उत्साहात साजरी