व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात खासदार निधीतून विविध विकास कामे सुरू; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

गोवित्री, कांब्रे शिरदे, सोमवडी, भाजगांव, कोळवाडी, वळवंती या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 5, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
MP-Shrirang-Barne

Photo Courtesy : MP Shrirang Barne


मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधी व जिल्हा नियोजन विभागामधून मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामे सुरू केली आहेत. गोवित्री, कांब्रे शिरदे, सोमवडी, भाजगांव, कोळवाडी, वळवंती या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार बारणे यांनी मागील नऊ वर्षात सर्वाधिक निधी मावळसाठी दिला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मुन्ना मोरे, विशाल हुलावळे, चंद्रशेखर भोसले, सरपंच वैशाली गायकवाड, स्वामी गायकवाड, सरपंच योगेश केदारी, रोहिदास जांभुळकर, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( various development works started in maval taluka with funds of MP Shrirang Barne )

खासदार श्रीरंग बारणे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. मावळ तालुका वाड्या-वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचा अभाव आहे. अंतर्गत रस्ते नाहीत. त्याकरिता खासदार बारणे यांनी खासदार निधी आणि जिल्हा वार्षिक निधीतून मावळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते करण्यावर भर दिला आहे. खासदार बारणे यांनी मागील नऊ वर्षात मावळ तालुक्याला सर्वाधिक निधी दिला आहे.

हेही वाचा – कौतुकास्पद.! आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्या निकेतनचा दहावीचा निकाल 96 टक्के; शुभम राऊत 89 टक्के गुणांसह प्रथम

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पवन, आंदर आणि नाणे मावळातील ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. गोवीत्री, कांब्रे शिरदे, सोमवडी, भाजगांवातील स्थानिक नागरिक या भागातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांच्या मागणीनुसार निधी दिला. त्यातून गावात विकास कामे सुरू झाली आहेत. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून काम करावे. गावाचा चांगला विकास करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांची मावळ ही भूमी आहे. महाराजांनी याच भूमीत मावळे घडविले. महाराजांनी जगावर राज्य केले. आपण महाराजांच्या भूमीतील आहोत. सर्वांनी एकोप्याने काम करावे.

अधिक वाचा –
– उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांनो सावधान! थेट कारवाई होणार, सायली म्हाळसकर ‘इन अ‍ॅक्शन मोड’
– महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिकांसाठी राखीव कोठा ठेवा; विश्वजित बारणेंची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

“पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत”

Next Post

मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी वरघडे, निकम तर उपाध्यक्षपदी आंभोरे, घारे । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-mandal

मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी वरघडे, निकम तर उपाध्यक्षपदी आंभोरे, घारे । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.