वडगाव नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण-2023 अभियानात सहभाग घेण्यात आला असून शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षा सायली रूपेश म्हाळसकर यांनी शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणी रस्ता लगत व परिसरात उघडयावर कचरा फेकलेला आढळून आला, या अवस्थेत पडलेल्या कचऱ्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अशा प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी व सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांवर जरब बसावी म्हणून नगरपंचायतच्या माध्यमातून कायदेशीर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पथक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे उघड्यावर कचरा न फेकता तो कचरा गाडी टाकावा, असे नगरपंचायतीच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात येत आहे. ( action will be taken against those who throw garbage in open area in Vadgaon maval )
अधिक वाचा –
– महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिकांसाठी राखीव कोठा ठेवा; विश्वजित बारणेंची मागणी
– कौतुकास्पद.! आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्या निकेतनचा दहावीचा निकाल 96 टक्के; शुभम राऊत 89 टक्के गुणांसह प्रथम