राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार (दिनांक 2 जून ) रोजी जाहीर झाला. पवन मावळ भागातील आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेचा निकाल यंदा 96.55 टक्के इतका लागला आहे.
शुभम गेणू राऊत हा 89.40 टक्के गुण घेत शाळेत पहिला आला आहे. तर ज्ञानेश्वरी संतोष गोणते हिचा 83.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक आणि सुप्रिया नवनाथ दिवाडकर हिचा 81.60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक आला आहे. ( dyaneshwar vidya niketan school ajivali 10th result 96 percent )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यंदा शाळेतील एकुण 29 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 6 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले आहे. तर, प्रथम श्रेणीत 14 विद्यार्थी, 6 विद्यार्थी ग्रेड 2 सह पास झालेत. तर 2 विद्यार्थ्यांना ग्रेड 3 मिळाली आहे असून शाळेचा एकूण निकाल 96.55 टक्के इतका लागला आहे.
दहावीचा निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागलाय. मुख्याध्यापक अरगडे सर, वर्ग शिक्षक गणेश पाटील, देशपांडे मॅडम, बारबोले सर, क्षीरसागर सर, बारबोले मॅडम, भिलारे सर, कराड सर, घाटे सर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर देखील शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षावर होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष सहकार महर्षी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे, सचिव डॉ बाळसराफ सर, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार वसंत पवार यांनीही विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
अधिक वाचा –
– शाब्बास!! पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के, तब्बल ९३ टक्के गुणांसह रितेश ठुले प्रथम
– अभिनंदन..! दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, असा चेक करा निकाल