मावळ तालुक्यातील धार्मिक समस्या जाणुन घेऊन त्या सोडविण्यासाठी, अनिष्ठ प्रथांना पायबंद घालण्यासाठी आणि तरून पिढी घडविण्यासाठी मावळ तालुका वारकरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. खंडोबा मंदिर कडधे येथे संस्थापक हभप नारायण महाराज केंडे यांनी नुकतीच महिला कार्यकारीणी जाहिर केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या वेळी बोलताना बेटी बचाओ, बेटी पढाओ, पर्यावरण संतुलन आणि भरकटत चाललेल्या तरुणाईला सन्मार्गाला लावण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून हाती घेतले जाईल असे मत सचिव सुरेखा काकरे यांनी व्यक्त केले. तसेच तरुण पिढीची नाळ संप्रदायाशी जोडण्यावर मंडळ कार्यशिल राहिल असे हभप कोमल घारे म्हणाल्या. तर गाव तेथे वारकरी मंडळाची शाखा स्थापन करून समाज प्रबोधनाचे मोठे काम हाती घेतले जाईल असे अध्यक्ष सारिकाताई निकम यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले. ( women executive of maval taluka warkari mandal )
कार्यकारीणी – सारीका निकम ( अध्यक्ष ), कोमल घारे ( उपाध्यक्ष), सुरेखा काकरे ( सचिव ) यांसह सुमन घरदाळे, सुषमा ओझरकर, छाया काकरे, रुपाली तुपे, मालन ढोरे, सखु तिकोणे, कमल काकरे, लक्ष्मी पऱ्हाड, सरस्वती जाधव, मंगल जाधव यांची विविध पदाधिकारी व सदस्यपदी निवड करण्यात आली.
या वेळी भरत वरघडे , भाऊ आंभोरे, दिनकर निंबळे, भाऊ काटे, बाळासाहेब गायकवाड, शंकर लोहोर, बळी ढोले आदीसह तालुक्याच्या विवीध भागातून मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या.
अधिक वाचा –
– “पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत”
– रणरणत्या उन्हात ‘सावित्रीं’चे वटवृक्षाला फेरे, मावळ तालुक्यात महिला वर्गाकडून वटपौर्णिमा उत्साहात साजरी