आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार महिन्यातील पहिल्या शनिवारी एक तास पक्षासाठी या उपक्रमा अंतर्गत किन्हई इथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. किन्हई गावात राष्ट्रवादी काँग्रेस महिला देहूरोड अध्यक्षा अरुणा पिंजन यांच्या निवासस्थानी देहूरोड शहर निरीक्षक – चंद्रजित वाघमारे, देहूरोड शहर अध्यक्ष – ऍड. प्रविण रघुनाथ झेंडे, महिला अध्यक्ष ऍड. अरुणा पिंजन, युवक अध्यक्ष आशिष बन्सल यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली. ( one hour for party program by NCP in Kinhai village dehu road maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन दिनांक 10-6-23 रोजी सकाळी देहूरोड शहर पक्ष कार्यालय येथे (पक्ष झेंडा) ध्वजरोहन करण्यात येणार आहे. देहूरोड मधील प्रत्येक वार्डात वडाचे झाड लावावे, त्याचे संगोपन वार्डातील प्रमुखाने करावी. अध्यक्ष व प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. कामाला वेग आला पाहिजे, प्रत्येक सेल अध्यक्ष यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची मीटिंग घ्यावी प्रत्येकाने हातात हात देऊन काम केले पाहिजे. पुढील काळात गतीने काम करावे संघटना मजबूत झाली पाहिजे. कार्यकारणी सदस्य नोंदणी अजून थोडी बाकी आहे ती पूर्ण झाली पाहिजे,’ असे अध्यक्ष ऍड प्रविण झेंडे यांनी सांगितले.
तसेच, ‘मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्यावर विरोधकांनी खोटी केस केली आहे, याचा देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत. परमेश्वर त्यांना या संकटातून लवकरात लवकर दूर करावे ही प्रार्थना,ट असे म्हणत झेंडे यांनी आपले वक्तव्य पूर्ण केले.
आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच देहूरोड च्या वतीने आमदार सुनिल आण्णा शेळके व त्यांच्या कुटुंबियांवर आरोपांचे संकट दूर होण्यासाठी देहूरोड येथील मरी माता मंदिर शिवाजीनगर या ठिकाणी होम पेटून व पूजा अर्चना करून मरी माता देवीला साकडे घालण्यात आले. तसेच अकरा नारळाचे तोरण बांधण्यात आले. ह्यावेळी महिला व स्थानिक नागरिक फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हेही वाचा – आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News
चंद्रजीत वाघमारे य़ांनी बोलताना, ‘मावळ तालुक्यात यापूर्वी माननीय सुनील आण्णा शेळके यांच्या सारखा आमदार नव्हता. परंतु अण्णा कार्यक्षम आमदार मावळ तालुक्यात काम खूप मोठ्या प्रमाणावर करत आहेत. कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाईल कार्यकर्ते व अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल त्यांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मावळमध्ये काही कंपन्यांमध्ये लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. महिलांना बचत गट योजनेसाठी त्यांना रोजगार निर्माण करण्यात यावा यासाठी आमदार साहेब व तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांच्याबरोबर एक मीटिंग लावली जाईल कार्यकर्त्यांना यासाठी योग्य तो न्याय दिला जाईल’ असे म्हटले.
यावेळी ओडिसा मध्ये रेल्वे अपघातात जवळपास 288 नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला, 900 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले, त्यांना 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली गेली.
अधिक वाचा –
– “पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत”
– पक्क्या लायसन्ससाठी मावळमध्ये ‘या’ दिवशी मेळाव्यांचे आयोजन, पाहा ठिकाण आणि तारीख