व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, November 11, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावातील श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या पारदर्शक कार्याचा आदर्श वारकरी संप्रदायाने घ्यावा – खासदार बारणे

मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी देवस्थान च्या कार्याचा आढावा व भविष्यातील देवस्थान उ्दिष्टे याचा आलेख वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांपुढे आपले मनोगतामधून सादर केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 6, 2023
in लोकल, मावळकट्टा, शहर
potoba-maharaj-mandir-vadgaon-maval

Photo Courtesy : Ananta Kude


अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका व श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्यांना सतरंजी तसेच दिंडीतील निष्ठावंत वारकरी विणेकरी महिला भगिनी यांचा यथोचित सन्मान समारंभ व श्री क्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान चा वार्षिक तेरावा अहवाल प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम संपन्न झाला. ( vadgaon maval shree potoba maharaj devasthan annual report presented )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग आप्पा बारणे आपल्या मनोगत मध्ये म्हणाले की, श्री क्षेत्र पोटोबा देवस्थानच्या पारदर्शक कार्याचा आदर्श वारकरी संप्रदायने घेऊन समाज कार्य करत राहावे व आपले जीवन वारकऱ्यांसाठी व्यथित करावे असे मत व्यक्त केले. तसेच भविष्यात वारकरी संप्रदाय व श्री क्षेत्र पोटोबा देवस्थानला विकासकामांसाठी सर्वोतपरी मदत करू असे आश्वासन दिले

याप्रसंगी अखिल भारतीय वारकरीमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले, देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, ह भ प संतोष महाराज काळोखे, देवस्थान चे उपाध्यक्ष गणेशअप्पा ढोरे, भाजपा चे प्रभारी भास्करअप्पा म्हाळसकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, जिल्हा अध्यक्ष सुखदेव ठाकर, या सर्वांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली. ह भ प बोधले महाराज यांनी देवस्थान व वारकरी संप्रदाय यांचे संयुक्त कार्याचे कौतुक केले.

मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी देवस्थान च्या कार्याचा आढावा व भविष्यातील देवस्थान उ्दिष्टे याचा आलेख वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांपुढे आपले मनोगतामधून सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त सचिव अनंता कुडे, स्वागत विश्वस्त सुभाषराव जाधव व दत्तात्रय महाराज शिंदे आणि सूत्रसंचालन नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, तर आभार वारकरी मंडळाचे वडगाव अध्यक्ष नारायण ढोरे यांनी मानले.

वडगाव वि का सोसायटीचे मा चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर यांनी सतरंजी, नगरपंचायत च्या उप नगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी महिला भगिनीं यांना साडीचोळी, नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी उपरणे असे वस्तुरूपी साहित्य देण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी,व्यासपीठावर पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सरपंच कुलदीप बोडके,मा सभापती राजाराम शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, देवस्थान चे विश्वस्त किरण भिलारे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुनिता कुडे, नगरसेवक, गटनेते दिनेश ढोरे, श्रीधर चव्हाण, ह भ प शांताराम बोडके, ह भ प गणेश महाराज जांभळे, दिलीप महाराज खेंगरे,महादूबा सातकर,संतोष कुंभार, सुनील हगवणे,पंढरीनाथ भिलारे आदीजन उपस्थित होते. महाप्रसाद चे नियोजन शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर व नगरसेवक किरण म्हाळसकर यांचे वतीने करण्यात आले.

अधिक वाचा –
– कार्ला लोणावळा येथील पर्यटन विकास प्रकल्पांना शिंदे-फडणवीस सरकारची मंजूरी!!
–  मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी


dainik maval jahirat

Previous Post

किन्हई गावात राष्ट्रवादीकडून ‘एक तास पक्षासाठी’ कार्यक्रम; कार्यकर्त्यांकडून आमदार शेळकेंसाठी मरीमाता मंदिरात यज्ञ

Next Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनांची सखोल चौकशी होणार – जिल्हाधिकारी । Shivrajyabhishek Sohala 2023

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivrajyabhishek-Sohala-2023

शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनांची सखोल चौकशी होणार - जिल्हाधिकारी । Shivrajyabhishek Sohala 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

massive explosion in capital delhi 8 people have died so far in blast in Delhi many have been injured

भीषण स्फोटाने हादरली राजधानी ! दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, देशभरातून शोक व्यक्त

November 10, 2025
Maharashtra State Election Commission

मोठी बातमी ! निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा वाढविली । Star Campaigner

November 10, 2025
Water-shut-off

तळेगाव दाभाडे शहरातील ‘या’ भागात आज पाणीबाणी । Talegaon Dabhade

November 10, 2025
Election campaign in Maval taluka Spontaneous response of women in Ambi village to Megha Bhagwat

मावळ तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी ; मेघाताई भागवत यांना आंबी गावात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Megha Bhagwat

November 9, 2025
Public relations tour of Dr Ashok Date main contender in Takve-Nane group

टाकवे-नाणे गटातील प्रमुख दावेदार डॉ. अशोक दाते यांचा जनसंपर्क दौरा ; भक्तिभावाच्या वातावरणात नागरिकांचे उत्स्फूर्त स्वागत

November 9, 2025
Potoba-Maharaj-Mandir

वडगाव मावळ : ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात सुरू । Vadgaon Maval

November 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.