व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीमधील घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 7, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीमधील घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येथील सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी तसेच सदस्य सारिका पदमुले, विकास वाल्हेकर, प्रमोद ढगे आणि कविता चौरे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. प्रताप गरवड आणि शेखर दळवी यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता.

संबंधित पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचा कर विहित तीन महिन्यांच्या कालावधीत भरला नसल्याचा दावा करीत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविले. त्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी पंचायत समिती, वडगाव मावळ यांच्याकडे सोपविली.

चौकशीत संबंधितांनी कराची थकबाकी विहित मुदतीत भरली नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. मात्र, जिल्हाधिकारी, पुणे यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज फेटाळला. त्यामुळे गरवड आणि दळवी यांनी या निर्णयाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले. अपिलावरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे तसेच उपलब्ध कागदपत्रांचा विचार करण्यात आला.

ग्रामपंचायतीची कर मागणी बिले, बिल बजावणीच्या पोहोच नोंदी, मासिक सभांचे ठराव आणि चौकशी अहवाल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुनावणीनंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी आदेश पारित केला. त्यात जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिलेला पूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला. तसेच वरील सहा पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले.

या प्रकरणात अपिलार्थी प्रताप गरवड आणि शेखर दळवी यांच्या वतीने अॅड. अमित आव्हाड, अॅड. सोपान मुंडे, अॅड. गौरव पाचपोळ, अॅड. जय राठोड आणि अॅड. वेदांत कारंजकर यांनी काम पाहिले. या निर्णयामुळे भाजे ग्रामपंचायतीतील विद्यमान सत्तासमीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्णयाची मावळच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

कर थकबाकी ठरली कळीचा मुद्दा
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १४ (१) (ह) नुसार ग्रामपंचायतीला देय असलेला कर किंवा फी, मागणी करून विहित पद्धतीने बिल दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत न भरल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरू शकते. या प्रकरणात कर मागणी, बिल बजावणी, थकबाकी आणि कर भरण्याच्या तारखांचा विचार करून अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपात्रतेचा निर्णय दिला. ग्रामपंचायतीचा कर विहित मुदतीत न भरल्याच्या प्रकरणात भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह सहा सदस्यांना सदस्यपदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी हा आदेश दिला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक


dainik maval jahirat

Previous Post

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 5, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.