व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर, मनुष्यबळ, औषधे, ऑक्सिजन, रक्तसाठा व आपत्कालीन सुविधांची तपासणी करण्याची मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 25, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेतील सुविधा, मनुष्यबळ आणि आपत्कालीन उपचार यंत्रणेचा तातडीने सखोल आढावा घेऊन आरोग्य व्यवस्थेचे ऑडिट करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या तळेगाव दाभाडे-इंदोरी मंडलाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मंडलाच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन दिले.

तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयातील माता व नवजात बालकाच्या मृत्यूच्या घटनेनंतर उपचार व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना वेळेवर आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळतात का, याची प्रशासनाने गांभीर्याने तपासणी करावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.

तळेगाव दाभाडे, लोणावळा व कान्हे येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, औषधे, ऑक्सिजन, रक्तसाठा, मॉनिटरिंग उपकरणे तसेच अन्य जीवनरक्षक सुविधा उपलब्ध आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

  • कान्हे फाटा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या तुलनेत प्रसूती, आपत्कालीन उपचार आणि गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध आहे का, याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे भाजपने म्हटले आहे.

रेफरल व्यवस्थेचीही तपासणी करण्याची मागणी
गंभीर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची आवश्यकता भासल्यास रुग्णवाहिका किती वेळेत उपलब्ध होते, रेफरलचा निर्णय कोणत्या वैद्यकीय कारणांवर घेतला जातो आणि रुग्णाचे प्रत्यक्ष स्थलांतर होण्यासाठी किती वेळ लागतो, याची नोंद तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रसूतीदरम्यान अचानक गुंतागुंत निर्माण झाल्यास संबंधित रुग्णालयात आवश्यक तातडीचे उपचार व शस्त्रक्रिया करण्याची क्षमता आहे का, याचेही प्रशासनाने प्रत्यक्ष ऑडिट करावे. तसेच ऑक्सिजन, रक्तसाठा, औषधे आणि जीवनरक्षक उपकरणे केवळ उपलब्ध आहेत की प्रत्यक्ष वापरण्यायोग्य स्थितीत आहेत, याची पडताळणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘केवळ मोठ्या इमारती उभारून आरोग्य व्यवस्था सक्षम होत नाही’
आरोग्य व्यवस्था ही नागरिकांच्या जीवनाशी निगडित मूलभूत गरज आहे. केवळ मोठ्या इमारती व पायाभूत सुविधा उभारून आरोग्य व्यवस्था सक्षम होत नाही; त्याठिकाणी चोवीस तास सक्षम डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, औषधे, उपकरणे आणि तातडीची उपचार व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता, उपचारातील विलंब किंवा अन्य त्रुटींमुळे भविष्यात कोणत्याही नागरिकाला जीव गमवावा लागू नये, यासाठी प्रशासनाने वेळबद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपने केली.

यावेळी भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे-इंदोरी मंडलाचे अध्यक्ष विनायक भेगडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, संघटनमंत्री महेंद्र पळसे, सरचिटणीस मनोहर भेगडे, हिम्मत पुरोहित, गौरव गुंड, समीर भेगडे, मीना भेगडे, अक्षय मोईकर, जेष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, दत्तात्रय मखामले, सचिव राजेंद्र डांगे, प्रसिद्धी प्रमुख आतिश रावळे, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ दाभाडे, अतुल भेगडे, अक्षय म्हस्के यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित, सक्षम आणि दर्जेदार शासकीय आरोग्य सेवा मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयांचे तातडीने ऑडिट करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी ठाम भूमिका भाजपच्या वतीने मांडण्यात आली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी


dainik maval jahirat

Previous Post

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.