Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी (दि.31) भरदिवसा ऐन गर्दीच्या ठिकाणी एका 19 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ( Murder in Talegaon Dabhade City )
तळेगाव स्टेशन भागातील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, आर्यन बेडेकर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी युवकावर धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या केली व तिथून पळून गेले. कितीतरी वेळ मृतदेह तिथेच पडून होता.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून गेल्याने त्यांचा शोध सुरु आहे.