Dainik Maval News : सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, लग्न मोडण्याची धमकी देत वारंवार केलेल्या छळाला कंटाळून तरूणीने अखेर टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मयत तरूणीच्या वडीलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हे दाखल दोघांस अटक केली आहे.
रणजित राजेंद्र देशमुख (वय २६ रा. वडगाव), प्राण येवले आणि अभिषेक अनिल ढोरे (सर्व रा. वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना डिसेंबर 2024 ते 24 जुलै 2025 च्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरूणीच्या वडीलांनी याबाबत वडगाव मावळ पोलिसांनी फिर्या दिली आहे. त्यानुसार, आरोपी रणजित देशमुख याने फिर्यादी यांची मुलगी हिचे कॅफेमध्ये सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून वेगवेगळ्या मोबाईलवरून तिला कॉल करून मुलीचा वेळोवेळी मानसिक छळ केला, तसेच तिच्या आई वडील यांना मारण्याची धमकी दिली आणि तिचे लग्न मोडण्याची धमकी दिली.
तसेच, आरोपी रणजित देशमुख याचे मित्र प्राण येवले आणि अभिषेक अनिल ढोरे (रा. वडगाव मावळ) यांनी देखील फिर्यादी यांची मुलगी हीला आरोपी रणजित देशमुख याचे सोबत मैत्री केली नाही तरी तुझी बदनामी करु, अशी तिला धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादींची 22 वर्षीय मुलगी हिने मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी, वडगाव मावळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 243/2025 भारतीय न्याय संहीता कलम 108, 351 (3), 115(2),3(5), अन्वये आरोपी रणजित राजेंद्र देशमुख, प्राण येवले आणि अभिषेक अनिल ढोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी रणजित देशमुख आणि अभिषेक ढोरे यास अट केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि डोईजड हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न