व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फोटो व्हायरल करण्याची, लग्न मोडण्याची धमकी देत केला छळ ; तरूणीने उचलले टोकाचे पाऊल, वडगाव मावळ येथील धक्कादायक घटना

सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, लग्न मोडण्याची धमकी देत वारंवार केलेल्या छळाला कंटाळून तरूणीने अखेर टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 2, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Girl-Committed-Suicide

Photo Courtesy : File Photo


Dainik Maval News : सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, लग्न मोडण्याची धमकी देत वारंवार केलेल्या छळाला कंटाळून तरूणीने अखेर टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मयत तरूणीच्या वडीलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हे दाखल दोघांस अटक केली आहे.

रणजित राजेंद्र देशमुख (वय २६ रा. वडगाव), प्राण येवले आणि अभिषेक अनिल ढोरे (सर्व रा. वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना डिसेंबर 2024 ते 24 जुलै 2025 च्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरूणीच्या वडीलांनी याबाबत वडगाव मावळ पोलिसांनी फिर्या दिली आहे. त्यानुसार, आरोपी रणजित देशमुख याने फिर्यादी यांची मुलगी हिचे कॅफेमध्ये सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून वेगवेगळ्या मोबाईलवरून तिला कॉल करून मुलीचा वेळोवेळी मानसिक छळ केला, तसेच तिच्या आई वडील यांना मारण्याची धमकी दिली आणि तिचे लग्न मोडण्याची धमकी दिली.

तसेच, आरोपी रणजित देशमुख याचे मित्र प्राण येवले आणि अभिषेक अनिल ढोरे (रा. वडगाव मावळ) यांनी देखील फिर्यादी यांची मुलगी हीला आरोपी रणजित देशमुख याचे सोबत मैत्री केली नाही तरी तुझी बदनामी करु, अशी तिला धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादींची 22 वर्षीय मुलगी हिने मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी, वडगाव मावळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 243/2025 भारतीय न्याय संहीता कलम 108, 351 (3), 115(2),3(5), अन्वये आरोपी रणजित राजेंद्र देशमुख, प्राण येवले आणि अभिषेक अनिल ढोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी रणजित देशमुख आणि अभिषेक ढोरे यास अट केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि डोईजड हे करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News

Next Post

गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडू – उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
We will plead in court to relax the time limit restrictions on Ganeshotsav said DCM Ajit Pawar

गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडू - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.