Dainik Maval News : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज ( दि. २६ मार्च ) निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, आज (गुरुवार, दि. 26 मार्च) रोजी सकाळी त्यांचे कार्डियॅक अरेस्टमुळे निधन झाले.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.ए आणि पीएच.डी पदवी संपादन केल्यावर तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केले. त्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी अनेक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला 1964 मध्ये सुरुवात झाली.
शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण 25 पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.
डॉ. जयसिंगराव पवर यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक – सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.
डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले होते.
डॉ. पवार यांनी ऐतिहासिक तसेच इतर अनेक विषयांवरील 25 पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना