Dainik Maval News : “फेब्रुवारी 2024 मध्ये अमृत भारत स्टेशन ह्या उपक्रमाप्रमाणे तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण, सुशोभिकरण सुरू झाले आहे. आता मे 2025 आला तरी किती टक्के काम झाले असेल ते रेल्वे प्रशासनालाच माहीत असावे. escalator/lifts चे काम करण्यासाठी तिथे दोन्ही फलाटांवर खड्डा खणून ठेवलेला आहे. तिथेच गेले ८-१० महिने work in progress असे फलकही लावले आहेत. परंतु त्यात progress ऐवजी regress असेच आहेसे वाटते. प्रवाशांना फलाटावरुन चालायला फारच अडचणीचे व धोकादायक झाले आहे. तिथला तो passage अतिशय चिंचोळा आहे. एका बाजूला ते लोखंडी फलक लावलेले आहेत व दुसऱ्या बाजूला फलाट संपतो व रेल्वे track आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमणा करावी लागते. तरी प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर करुन लौकरातलौकर पूर्णत्वास न्यावे. ही सर्व प्रवाशांची मागणी आहे.”
– प्रकाश वा. दातार, तळेगाव दाभाडे.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News