मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) साते ग्रामपंचायतीच्या ( Sate Gram Panchayat ) सरपंचपदी आरती आगळमे ( Sarpanch Aarti Aagalame ) यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते सरपंच संतोष शिंदे यांनी त्यांच्या पदाचा निश्चित कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी साते ग्रामपंचायत कार्यालयात मंडल अधिकारी संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. ( Aarti Aagalame Selected As Sarpanch )
सरपंच पदासाठी यावेळी आरती सागर आगळमे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश जगताप यांनी काम पाहिले. तर निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी पाहिले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सरपंच निवडीच्या या प्रक्रियेवेळी उपसरपंच आम्रपाली मोरे, सखाराम काळोखे, गणेश बोऱ्हाडे , ऋषिनाथ आगळमे, संदीप शिंदे , वर्षा नवघणे, मीनाक्षी आगळमे, ज्योती आगळमे, श्रुती मोहिते आदी जण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Aarti Aagalame Selected As Sarpanch Of Sate Gram Panchayat )
अधिक वाचा –
बेबडओहोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ‘यांची’ निवड, निवडणूक बिनविरोध
मनसेच्या मागणीला यश; इंदुरीतील चव्हाणवाडा, संघविहार भागातील विजेची समस्या मिटली