मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) बेबडओहोळ-पिंपळखुटे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कमल रोहिदास गराडे ( Kamal Garade ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेबडओहोळ ग्रामपंचायतीच्या ( Bebad Ohol Gram Panchayat ) मावळत्या उपसरपंच लता गायकवाड यांनी त्यांच्या पदाची निश्चित कालावधी पुर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच Deputy Sarpanch ) पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (9 सप्टेंबर) रोजी सरपंच सविता सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. या विशेष सभेत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामसेवक यांनी काम पाहिले. निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी कमल गराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सविता सप्रे यांनी जाहीर केले. ( Kamal Garade Elected Deputy Sarpanch Of Bebad Ohol Pimpalkhute Gram Panchayat )
अधिक वाचा –
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
बाबो..! मुलीच्या कानात गेला साप, काढताना डॉक्टरला फुटला घाम; बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ