आज (गुरुवार, दि 22 डिसेंबर) रोजी सकाळी 6 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 39/400 दरम्यान तीन गाड्यांचा अपघात झाला. अपघात भीषण होता, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतू कारमधील प्रवाशांना यात किरकोळ जखमा झाल्या असून गाड्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबईकडे जाणारा ट्रक (क्रमांक TN-39-CM 9227) वरील चालक आर. अरुण ( वय 36, रा. कर्नाटक) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे जाणाऱ्या I20 कार (क्रमांक MH-48-P-3689) हिला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर पुढच्या व्हॅगनार कारला (क्रमांक MH-12-GK-4286) धडक मारून काही अंतर फरफटत नेले. यात कारमधील महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालय, पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. ( Accident Between Truck And Car Near Khopoli On Mumbai Pune Expressway )
अपघातात बाधित झालेल्या दोन्ही कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावल्याने मोठी हानी टळली असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, बोरघाट वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्सचे जवान मदतीसाठी आल्याने मदतकार्य वेळेत पार पडले. बाधित वाहने लागलीच बाजूला काढल्यामुळे वाहतूकही खुली झाली. हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत सीआरपीएफ गेटजवळ अनोळखी व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू
– मोरवे गावातील महिलांकरिता मसाला बनवण्याचे कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम