व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पवना कॅम्पिंग चालक-मालक यांची बैठक, नियम पाळण्याची ताकीद

फांगणे गावाच्या हद्दीतील द रुलर लाइफ रिसॉर्ट अँड कॅम्पिंग येथे ही बैठक घेण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 22, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Pavana-Camping

Photo : Nitesh Kavade


बुधवारी (दिनांक 21 डिसेंबर 2022) रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पवना कॅम्पिंग चालक-मालक यांची लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात आली. फांगणे गावाच्या हद्दीतील द रुलर लाइफ रिसॉर्ट अँड कॅम्पिंग येथे ही बैठक घेण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कॅम्पिंग चालक-मालक यांना करण्यात आल्या सुचना…

कॅम्पिंगला येणारे गॅसचे डिटेल्स घेण्यात यावे, सुरक्षारक्षक यांची नेमणूक करण्यात यावी, येणाऱ्या गेस्टची घातपात विरोधी तपासणी करण्यासाठी मेटल डिटेक्टरची व्यवस्था करावी, गरजेच्या वेळी प्राथमिक उपचार सुविधा असावी, विद्युत रोषणाईचे वेळी विद्युत निरीक्षक यांच्याकडून तपासणी करावी, गेस्टच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी, कॅम्पिंग मध्ये कोणत्याही प्रकारचे अवैधधंदे चालणार नाहीत, महिला व मुलींच्या संदर्भात अनुचित घटना घडणार नाहीत, यासाठी विशेष उपाययोजना करावी.

कॅम्पिंगमध्ये प्रवेशद्वार गर्दीचे ठिकाणी पार्किंग परिसर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अध्यायावत करावेत, सर्व विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे, स्पीकर परवाना घेऊन त्याचे नियमांचे पालन करावे, कॅम्पिंग दिलेल्या वेळेपर्यंत सुरू ठेवावे, कॅम्पिंग मधील कामगार यांचे चरित्र पडताळणी करून त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी, पवना धरणाच्या पाण्यात गेस्ट उतरून दुर्घटना करणार नाहीत यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे, एखाद्या व्यक्ती संशयित वाटल्यास पोलिसांना कळवणे, ख्रिसमस व 31 डिसेंबरला होणारे संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेणे, अवैध घटना करताना दळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

सदर बैठकीला सहाय्य पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस हवालदार नितेश कवडे, संतोष शेळके, नितीन कदम, रफिक शेख, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक दत्ता शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सागर धनवे, सुभाष शिंदे, होमगार्ड वाळुंज यांच्यासह पोलिस स्टेशन हद्दीतील पवना कॅम्पिंग चालक-मालक 60 ते 70 लोक उपस्थित होते.

अधिक वाचा –

– यापुढे चुकीला माफी नाही; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हद्दीतील खासगी बंगला चालक-मालक यांना नियमांची तंबी
– भीषण अपघात! खोपोलीजवळ एक्सप्रेस वेवर अनियंत्रित ट्रकची दोन कारला धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

– तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत सीआरपीएफ गेटजवळ अनोळखी व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

भीषण अपघात! खोपोलीजवळ एक्सप्रेस वेवर अनियंत्रित ट्रकची दोन कारला धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

'निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो', तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.