मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शनिवार (दिनांक 24 जून) रोजी खंडाळा घाटात अंडा पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात एक जण ठार झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई पुणे महामार्गावर कंटेनरने दोन पिकअपला धडक दिली आणि एका पिकअपवर जाऊन पलटी झाला. या अपघातात पिकअप चालक ठार झाला तर एका शालेय विद्यार्थ्यासह 2 जखमी झालेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कंटेनर खंडाळा घाटातून भरधाव वेगाने मुंबईकडे निघाला होता. अंडा पाॅईंट येथील तीव्र उतार आणि वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि त्याने दोन पिकअपला धडक दिली. नंतर हाच कंटेनर त्यातील एका पिकअपवर उलटला. यात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. ( Accident involving container and pickup tempo on Mumbai Pune Expressway )
अपघाताची माहिती मिळताच राज्य रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक, खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिकअपमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोपोली पोलीस, आयआरबीचे पथक, महामार्ग पोलिसांच्या पथकाने क्रेनच्या सहायाने कंटेनर, पिकअप टेम्पो बाजूला काढला आणि वाहतूक सुरळीत केली.
अधिक वाचा –
– रेशनच्या तांदळाचा काळाबाजार; तब्बल 27 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत, शिरगाव पोलिसांची धडक कारवाई!!
– कौतुकास्पद! रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना खाऊ आणि धान्य, किराणा वाटप