मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर किलोमीटर 39 च्या दरम्यान एक विचित्र अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट पुणे लेनवर गेला आणि पुण्याकडे जाणाऱ्या टँकरला धडकून उलटला. मंगळवार (18 ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. ( Accident On Mumbai Pune Expressway Truck Hit Tanker )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बाधित वाहने क्रेन आणि पुलरच्या सहाय्याने बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच अपघातामुळे पुणे कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती, ती सुरळीत करण्याचे काम सुरु करण्यात आले. ( Accident On Mumbai Pune Expressway )
अपघात घडल्यानंतर ट्रकचा चालक पळून गेला. परंतू एकूण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. टँकरला बसलेल्या धडकेने ऑइल रस्त्यावर सांडले होते, ज्यावर बचाव दलाकडून उपाययोजना करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजना आणि सुधारित धोरण ठरवण्याबाबत उच्चस्तरिय बैठक, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
गुलाल उधळला ! चांदखेड ग्रामपंचायतीवर ‘या’ पॅनेलची सत्ता, मीना माळी थेट जनतेतून सरपंच, वाचा संपूर्ण निकाल