मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) एक भीषण अपघात घडला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत शहरानजीक ( Kamshet City ) हा अपघात घडला. बुधवार (19 ऑक्टोबर) पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात घडला असून यात राज्याचे मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumre ) यांचे मावस बंधू अंबादास हरिश्चंद्र नरवडे ( Ambadas Naravane ) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( 19 ऑक्टोबर) रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पुणे लेनवर किलोमीटर नंबर 74/100 बउर गावचे हद्दीत इनोव्हा कार (एमएच – 20 जी.सी. 9777) पुणे च्या दिशेने जात असताना लेन नंबर दोन मधून बाजूने जाणारे टाटा टेम्पो (एमएच – 02 एफ.यु. 6584) ने इनोव्हाच्या डावे बाजूस ठोकल्याने पाठीमागील सीटवर बसलेले अंबादास हरिश्चंद्र नरवडे (वय 51 रा. पाचोड ता. पैठण, जि. औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले. तसेच गाडीचा चालक आणि त्यांचे सोबत प्रवास करणारे सुरेश बहुले यांना किरकोळ दुखापती झाल्या त्यांना उपचारासाठी पवना हॉस्पिटल या ठिकाणी आणले असता डॉक्टरांनी अंबादास नरवडे यांना तपासून त्यांच्या मृत्यू झाल्याचे घोषित केले. टाटा टेम्पो चालक जखमी असून पवना हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहे. मृत अंबादास नरवडे हे राज्याचे मंत्री महोदय संदिपान भुमरे यांचे नातेवाईक आहेत.
वन्यजीव रक्षक संस्था मावळचे आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष गणेश मिसाळ, गणेश ढोरे, राणी अँब्युलन्सचे अजय मुऱ्हे यांनी घटनास्थळी मदत केली. ( Accident On Old Mumbai Pune Highway At Kamshet Minister Sandipan Bhumre Brother Death )
अधिक वाचा –
शिळींबमध्ये चोरट्यांनी दुकान फोडलं, गावातल्या मुख्य चौकातील किराणा दुकानातून हजारोंचा माल लंपास
रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजना आणि सुधारित धोरण ठरवण्याबाबत उच्चस्तरिय बैठक, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश