Dainik Maval News : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ओला-उबेर आदी ऑनलाइन टॅक्सीला लोणावळा शहरात व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली. या निर्णयाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिवहन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक रिक्षा, टॅक्सी चालक, प्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक शुक्रवारी लोणावळा येथे संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या बैठकीला आमदार सुनील शेळके, पुणे ग्रामीण परिवहन विभागाचे अधिकारी राहुल जाधव, प्रवीण भोसले, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संजय मावकर, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, किरण गायकवाड, माजी नगरसेवक नारायण पाळेकर, काँग्रेसचे निखिल कवीश्वर, मंजूताई वाघ, अरुण लाड, मुकेश परमार, संजय भोईर, बाबा ओव्हाळ, शिवसेना तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, देविदास कडू, रवि पोटफोडे, भरत चिकणे, सनी पाळेकर आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. ( According to Ajit Pawar directive online transport services should be stopped in Lonavla MLA Sunil Shelke )
लोणावळा शहरात दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. परंतु ऑनलाइन वाहतूक कंपन्यांमुळे स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जातो. यापार्श्वभूमीवर लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून स्थानिक व्यवसायिकांनी वेळोवेळी आंदोलन, निदर्शने केली. निवेदन देऊन ऑनलाइन टॅक्सी व्यवसायाला लोणावळ्यात बंदी घालावी, अशी मागणी केली होती. त्यावर अजित पवार यांनी लोणावळा शहरासाठी घेतलेल्या विशेष बैठकीत ऑनलाइन टॅक्सी व्यवसायास लोणावळ्यात बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
“अजितदादांनी दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाइन वाहतूक सेवा लोणावळ्यात बंद झाली पाहिजे. एग्रीकेटर परवान्यासाठी आवश्यक गोष्टींची व नियमांची पूर्तता न केल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने व जिल्हाधिकाऱ्यांनी ओला, उबेर यासारख्या कंपन्यांना परवाना नाकारला होता. त्याचप्रमाणे आता लोणावळा शहरात देखील ही वाहतूक कायमची बंद राहील, याची काळजी आरटीओ अधिकाऱ्यांनी घ्यावी. स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा रोजगार कोणी हिरावून घेणार नाही. यासाठी आम्ही सर्वजण नेहमीच प्रयत्नशील आहोत. पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या टॅक्सी व रिक्षा सज्ज असतील,” असे आमदार सुनील शेळके यावेळी म्हणाले.
अधिक वाचा –
– छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval
– ‘केवळ आठ महिन्यात पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– वडगाव येथे सकल हिंदू समाज मावळ यांचा ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ । Vadgaon Maval