वन विभागाची परवानगी न घेता उदमांजर पकडण्यासाठी 3 हजार रुपयांची मागणी करत पिंजरा लावून अवैधरित्या वन्यजीव हाताळल्याप्रकरणी आरोपी साईदास शंकर कुसाळ यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Accused Arrested For Making Fake Letterhead And Demanding Money For Catching Wild Animals )
वन विभागाच्यावतीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये संरक्षण देण्यात आलेल्या उदमांजर या वन्यप्राण्यास पकडण्यासाठी आरोपी कुसाळ यांनी वन विभागाची परवानगी न घेता वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेचे बनावट लेटरहेड तयार केले. मेरीयंट डेव्हलपर्स प्रा.लि., 299, बोट क्लब, बंड गार्डन, पुणे यांच्याकडे दरपत्रक पिंजरा रक्कम 3 हजार रुपयांची मागणी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार अवैधरित्या पिंजरा लावून अवैधरित्या वन्यजीव हाताळल्या प्रकरणी आरोपी साईदास कुसाळ रा. गल्ली क्र. 3 यशवंत नगर, दत्त हॉटेल जवळ चंदननगर, पुणे-14 याला अटक करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 2,9,16,39,49 (अ) आणि 51 अन्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वन्यप्राण्याची मुक्तता (रेस्क्यू) करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मान्यता प्राप्त नसलेल्या रेस्क्यू संस्थेकडून पैशाची मागणी केल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या परिसरात वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरू नये. नजीकच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा वनपरिक्षेत्र कार्यालयास अथवा वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! ‘कुणीही लगेच दावा सांगू नका’, सीमावादावर अमित शाहांच्या दरबारी तात्पुरता तोडगा, वाचा सविस्तर
– बाळा भेगडे, अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत विविध लोकसभा मतदारसंघांतील पक्षाच्या कार्यक्रमांची आखणी