व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किशोर आवारे हत्या प्रकरणातील एसआयटी प्रमुख प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द, नेमके काय घडले? वाचा

राज्य पोलिस दलातील उपअधीक्षक / सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दिनांक 22 मे) बदल्या करण्यात आल्या होत्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 25, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
ACP-Prerna-Katte

File Image


पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीच्या प्रमुख अधिकारी एसीपी प्रेरणा कट्टे यांची चंद्रपूर जिल्ह्यात होणारी बदली रद्द करण्यात आली आहे.

राज्य पोलिस दलातील उपअधीक्षक / सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दिनांक 22 मे) बदल्या करण्यात आल्या. त्या बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची करण्यात आलेली बदली रद्द झाली आहे. राज्याच्या गृह विभागातर्फे याबाबत बुधवारी (दिनांक 24 मे) याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. ( ACP Prerna Katte SIT Head Of Kishor Aware murder case transfer Canceled )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पिंपरी चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. यात गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक गडचिरोली इथे, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार याठिकाणी, तर चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक पदी चिमूर (जि. चंद्रपूर) इथे बदली केली होती. मात्र सुधारीत आदेशानुसार प्रेरणा कट्टे यांची बदली सध्या रद्द करण्यात आली आहे. कट्टे यांची बदली रद्द करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दिनांक 12 मे रोजी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादीत तालुक्यातील आमदारांसह अनेकांची नावे आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एसआयटीची स्थापना केली. प्रमुख म्हणून त्यांनी एसीपी प्रेरणा कट्टे यांच्याकडे जबाबदारी दिली होती. या प्रकरणाचा तपास होत असताना अलिकडे काही धक्कादायक बाबी समोर येत होत्या, अशातच एसआयटी प्रमुखांची बदलीची बातमी समोर आल्याने अनेक चर्चा होऊ लागल्या. मात्र कट्टे यांची बदली रद्द झाल्याने सध्या तरी या प्रकरणाच्या तपास प्रमुख म्हणून त्याच असणार आहेत, असे समजते.

अधिक वाचा –
– दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! सभापती आणि उपसभापती पदाची निवड झाली बिनविरोध
– लोकसभेसाठी मविआचे उमेदवार ठरले? सोशल मीडियावर यादी व्हायरल, मावळमधून पार्थ पवारांचे नाव, चर्चांना उधाण


dainik maval jahirat

Previous Post

दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! सभापती आणि उपसभापती पदाची निवड झाली बिनविरोध

Next Post

शाब्बास..! राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी, एका क्लिकवर चेक करा तुमचा निकाल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
SSC-HSC-Exam-Result

शाब्बास..! राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी, एका क्लिकवर चेक करा तुमचा निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.