पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीच्या प्रमुख अधिकारी एसीपी प्रेरणा कट्टे यांची चंद्रपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोणत्या नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पिंपरी चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अलिकडे बदल्या झाल्या आहेत. यात गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक गडचिरोली इथे बदली झाली आहे. वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार याठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर, चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक पदी चिमूर (जि. चंद्रपूर) इथे बदली झाली आहे. ( ACP Prerna Katte SIT Head Of Kishor Aware murder case has been transferred )
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दिनांक 12 मे रोजी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादीत तालुक्यातील आमदारांसह अनेकांची नावे आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एसआयटीची स्थापना केली. प्रमुख म्हणून त्यांनी एसीपी प्रेरणा कट्टे यांच्याकडे जबाबदारी दिली होती. या प्रकरणाचा तपास होत असताना अलिकडे काही धक्कादायक बाबी समोर येत होत्या, अशातच एसआयटी प्रमुखांची बदली झाल्याने आवारे हत्या प्रकरण तपासाचे पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा –
– दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! सभापती आणि उपसभापती पदाची निवड झाली बिनविरोध
– लोकसभेसाठी मविआचे उमेदवार ठरले? सोशल मीडियावर यादी व्हायरल, मावळमधून पार्थ पवारांचे नाव, चर्चांना उधाण