सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याच्या अनुषंगाने लोणावळा शहर आणि परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता यंदा लोणावळा उपविभागात पोलिस प्रशासनाकडून चांगले नियोजन करण्यात आले होते. तगडा पोलिस फौजफाटा आणि अनेक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांच्या मदतीने लोणावळा उपविभागात पोलिसांनी 30 व 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी परफेक्ट बंदोबस्त केला होता. त्यामुळेच हुल्लडबाजी करणे, दारू पिऊन गाड्या चालवणे, विनाकारण गोंधळ घालणे, वाहतूकीचे नियम मोडणे असे प्रकार यंदा कमी झाल्याचे दिसून आले. समोर आलेल्या माहितीनुसार यंदा 30 आणि 31 डिसेंबर रोजी लोणावळा उपविभागात पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी तसेच वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी 510 केसेस दाखल केल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, लोणावळा उपविभागात पोलिसांनी दिनांक 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2023 रोजी ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी कठोर कारवाई केली. त्यानुसार उपविभागातील वडगाव मावळ पोलिस ठाणे, लोणावळा शहर पोलिस ठाणे, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे आणि कामशेत पोलिस ठाणे इथे एकूण 510 केसेसची नोंद करण्यात आली असून तब्बल 3 लाख 61 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी ही माहिती दिली. ( Action against 510 drivers for drunk and drive cases and violation of traffic rules in lonavala subdivision )
पोलिस स्टेशननिहाय कारवाईची माहिती –
1. वडगाव मावळ पोलिस स्टेशन
ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – 03
एकूण केसेस – 63
एकूण दंड – 52,500 रुपये
2. लोणावळा शहर पोलीस स्टेशन
ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – 0
एकूण केसेस – 361
एकूण दंड – 2,61,300 रुपये
3. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन
ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – निरंक
एकूण केसेस – 20
एकूण दंड – 10,000 रुपये
4. कामशेत पोलीस स्टेशन
ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – 02
एकूण केसेस – 66
एकूण दंड – 37,700 रुपये
लोणावळा उपविभागामध्ये एकूण
ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस – 05
एकूण केसेस – 510
एकूण दंड – 3,61,500
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बहुउद्देशीय मोरया दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन । Vadgaon Maval
– शिवसेना शिंदे गट फुंकणार मावळ लोकसभेचे रणशिंग? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी मतदारसंघात जाहीर सभा
– मावळ कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने वारकरी-भाविक श्रोते उपस्थित । Kirtan Festival