प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्याबद्दल मावळ तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत. तसेच, या निर्णयाचे स्वागत करतानाच राज्यातील लहान-मोठ्या 70 किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचीही मागणी केली आहे. बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, महेंद्र असवले, सचिन शेलार, अमोल पगडे, योगेश शेटे, सुशील वाडेकर, बाळासाहेब खांडभोर आदी पदाधिकाऱ्यांनी याबद्दल निवेदन दिले आहे. ( Action Against Illegal Construction Near Afzal Khan Grave Pratapgad Satara )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीच्या अतिक्रमणाचा सोक्षमोक्ष लावला. याबद्दल विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने वनमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे आभार. वीस वर्षांपूर्वी संघटनेच्या नेतृत्वाखाली या किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी मोठे जनआंदोलन केले होते. त्यात अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली होती.”
“मावळ तालुक्यातील 23 कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे. त्या केसेस आजही सुरू आहेत. गुरुवारी झालेल्या कारवाईमुळे हे कार्यकर्ते सुखावले आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत. प्रतापगडावरील कारवाई प्रमाणेच राज्यातील इतर 70 किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांवरही अशीच कारवाई करावी,” अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
– हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा तळेगाव दाभाडेत भाजपाकडून निषेध