हिंदू धर्माविषयी बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. “हिंदू शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे”, असे विधान जारकीहोळी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर जारकीहोली यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून माफी मागितली. परंतू, त्यांच्या या वक्तव्याचा देशभर निषेध करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे भाजपाकडूनही जारकीहोळी यांचा निषेध नोंदवण्यात आला. ( Karnataka Congress Leader Satish Jarkiholi Anti Hindu Offensive Statement Maval BJP Protest Movement )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले होते जारकीहोळी ?
“हिंदू शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे. या शब्दाचा भारताशी काहीही संबंध नाही. हा शब्द लोक कसा काय स्वीकारु शकतात?,” असे वक्तव्य जारकीहोली यांनी बेळगावमध्ये रविवारी केले होते. “हिंदू शब्दाचा उगम कुठून झाला? हा शब्द आपला आहे का? हा इराण, इराक, उझबेकिस्तान, कझाकिस्तानातील पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा भारताशी काय संबंध? या शब्दाचा स्वीकार तुम्ही कसा करू शकता? या शब्दाचा अर्थ जर कळला तर तुम्हाला लाज वाटेल,” असे बोलत त्यांनी यासंदर्भात चर्चेची मागणी केली होती.
अधिक वाचा –
– ‘खोटे सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू’, भाजपाचा विरोधकांना इशारा
– दोन पोती खरेदी करत अजित पवारांकडून मावळमधील ‘इंद्रायणी भात खरेदी’ उपक्रमाचा शुभारंभ