महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील 7 दिवस कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. तसेच, पक्षाच्याही कोणत्याच कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली नव्हती. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात शेवटच्या दिवशी शरद पवार थेट रुग्णालयातून कार्यक्रमस्थळी आले, पण अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, शुक्रवारी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे एका कार्यक्रमाला अजित पवार आले आणि माध्यमांनी त्यांना पहिला प्रश्न केला, दादा 7-8 दिवस कुठे गायब होता? तेव्हा अजित पवारांनी अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आणि सर्वांचेच गैरसमज दूर केले. ( Leader of Opposition Ajit Pawar attended public event in Talegaon Dabhade After 7 Days )
अधिक वाचा –
– अखिल भारतीय वारकरी मंडळाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी शांताराम बोडके, पाहा नव्या कार्यकारिणीची संपूर्ण यादी
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, रविंद्र भेगडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी