व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई ; शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दक्षता घ्या – प्रादेशिक परिवहन कार्यालय

शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई ; शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दक्षता घ्या - प्रादेशिक परिवहन कार्यालय

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 8, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
school-bus

File Image


Dainik Maval News : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन त्यापैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली; यामाध्यमातून २२ लाख २२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस चालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी दिले आहेत.

त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन व वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच पोलीस विभागामार्फत वाहनचालक, वाहक, मदतनीस यांच्या पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. शाळा व्यवस्थापन व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांनी स्कुल बस नियमावली व नविन अटी शर्तीचे पालन होत असल्याबाबत तपासणी करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले आहे.

सर्व शाळांमध्ये शासन निर्णय क्रमांक संकिर्ण ११२५/प्र.क्र. २४१/२५/ एसएम-१, दि. १६ एप्रिल २०२५ नुसार सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भैतिक सुविधा विकसन समिती यांची स्थापना करण्याची दक्षता शालेय शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे. सर्व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समित्यांनी शालेय बसवर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली असल्याचे प्रमाणपत्राची तपसणी करावी. ज्या वाहन चालकांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नसेल अशा वाहन चालकांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचे वाहन चालविण्यास दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

शालेय विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्याबाबत धोरण निश्चित करण्याकरिता २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व महिला बाल विकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील प्रकरणः क्रमांक १० मध्ये समितीने दिलेल्या निष्कर्ष व शिफारशीमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत पुढील शिफारशी करण्यात आल्या आहेत.

शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याबाबत शाळेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहेत. वाहनचालक, वाहक, क्लीनर यांची पोलीस पडताळणी होणे आवश्यक आहे.

परिवहन विभाग व पोलीस विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संयुक्त तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल. शाळांनी शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीतपणे होईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण


Previous Post

धक्कादायक ! तळेगाव शहरात वृद्ध महिलेने जीवन संपविले , परिसरात खळबळ

Next Post

संतापजनक ! मावळात अल्पवयीन बालिकेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kamshet-Police-Station

संतापजनक ! मावळात अल्पवयीन बालिकेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.