Dainik Maval News : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वनक्षेत्रामध्ये वणवा लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रत्येक वणवा हा निसर्गनिर्मित असतोच असे नाही, काहीवेळा मानवी चुकीमुळे किंवा जाणूनबुजून वणवा लावलो जातो. अशावेळी वनसंपदेचा ऱ्हास होतो. यापार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाले असून वणवा लावणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.
मावळ तालुका हा डोंगर टेकड्यांचा, वनांनी वेढलेला प्रदेश आहे. मावळात मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र असून गायरान, चराई क्षेत्र, राखीव क्षेत्र मोठ्या प्रामणात आहेत. सदर वनक्षेत्रात वणवा लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या असून सातत्याने यात वाढ होत आहे. काही ठिकाणी टवाळखोर मुद्दाम आगी लावीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, यापार्श्वभूमीवर जाणूनबुजून वनसंपदेचा ऱ्हास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
मावळ तालुक्यात वडगाव आणि शिरोता अशी दोन वनपरिक्षेत्रे आहेत. दोन्ही परिक्षेत्रात २१ हजार हेक्टरमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. मावळ तालुक्यातून पुणे-मुंबई महामार्ग, तसेच पुणे-द्रुतगती मार्ग जातात. या रस्त्यांवरून प्रवास करणारे काही प्रवासी विडी-सिगारेट रस्त्याच्या बाजूला टाकतात, त्यामुळेही आगी लागतात.
वनपरिक्षेत्रात आग लावणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा, तसेच दंड देखील होऊ शकतो. वनपरिक्षेत्रात वन विभागाने गस्त वाढवली आहे. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व प्रवाशांनी, तसेच पर्यटकांनी सिगारेट किंवा इतर ज्वलनशील पदार्थ, वस्तू वनपरिक्षेत्रात टाकू नयेत, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा