व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तुम्ही निवडून यालच..आपल्याला हा गड राखायचाय’, उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरेंना प्रचार सुरु करण्याचे आदेश

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजोग वाघेरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sanjog-Waghere-Uddhav-Thackeray

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजोग वाघेरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दिनांक 17 मार्चला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्या 16 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. त्यात संजोग वाघेरे यांना मावळ लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या संजोग वाघेरे यांना दोन वेळा लोकसभेची उमेदवारी डावलण्यात आली. त्यानंतर मात्र यंदा त्यांनी उमेदवारीचे वातावरण पाहून थेट शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आता त्यांनाच अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी जाहिर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजोग वाघेरे यांनी गुरुवारी (दि. 28) मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. ( After announcing his candidature for Maval Lok Sabha constituency Sanjog Waghere met Uddhav Thackeray )

संजोग वाघेरे पाटील हे उध्दव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी आणि सदिच्छा भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. ‘तुम्ही निवडून याल आणि हा गड आपल्याला पुन्हा राखायचाय अशा पध्दतीने काम आणि प्रचार करा,’ असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती वाघेरे यांनी दिली.

“पक्षाने माझ्यावर विश्‍वास दाखवून मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, सचिन अहिर यांचा आभारी आहे. मावळची परंपरा राखण्यासाठी शिवसेनेचा गड राखून विजय मिळवेल असा मला विश्‍वास आहे.” – संजोग वाघेरे, उमेदवार (मावळ लोकसभा मतदार संघ)

अधिक वाचा –
– रेल्वेच्या गर्दीमुळे पोलिसाचा मृत्यू, कर्तव्याला जाताना डोंबिवली-कोपर दरम्यान धावत्या गाडीतून पडले
– मावळ लोकसभेसाठी मराठा समाजाकडून ‘या’ नावाची होतेय चर्चा । Maval Lok Sabha Election 2024
– आमदार सुनिल शेळके हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार का? । Maval Lok Sabha Election 2024


Previous Post

वडगाव मावळ शहरात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा । Vadgaon Maval

Next Post

समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील आर्या अहिरे प्रथम । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Samarth-Shalaka-exam

समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील आर्या अहिरे प्रथम । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.