व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गौरी-गणपती विसर्जनानंतर मावळात लेकी मागण्याची परंपरा ; गावोगावी रंगला ‘लेकी मागण्याचा’ खेळ । Maval News

गणेशोत्सवाच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, चालीरिती असल्याचे दिसून येतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 6, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
After immersion of Gauri-Ganapati tradition of leki magane in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गणेशोत्सवाच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, चालीरिती असल्याचे दिसून येतात. यात गौरी गणपती विसर्जनानंतर लेकी मागण्याची परंपरा मावळातील ग्रामीण भागात आजही आहे. मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पवन मावळ विभागातील अनेक गावांत लेकी मागण्याचा पारंपारिक खेळ उत्साहात संपन्न झाला. जवळपास सर्वच गावांमध्ये लेकी मागण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावातील लहान मुलींपासून ते वृध्द महिलांपर्यंत सर्वजण आनंदाने यात सहभागी होत असतात. गौरीसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशीन महिलांचा यात उत्साहाने सहभागी होत असतात.

महिला संसारातील सुख-दुःख विसरून सहभागी होतात :
गावांतील गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेकी मागण्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो. येळसे गावातील यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. गावातील प्रत्येक घरातील महिला यात सहभागी झाल्या होत्या. एकत्र आल्यानंतर महिलांनी फुगड्या खेळणे, फेर धरणे, पारंपारिक गाणी गाणे, उखाणे घेणे अशा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची अशा स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत आणली.

मुलगी मागणे आणि लग्न सोहळा :
लेकी मागण्याच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे, एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजविले जाते. त्या मुलाकडील मंडळी मुलीच्या घरी मुलगी मागण्यासाठी जातात. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम होतो. पसंतीनंतर लग्नाची तयारी ढोल ताशांच्या गजरात नवरा नवरीची वरात काढली जाते. यामध्ये महिला मनसोक्त नाचतात, गातात. साधारण तास दीड तास ही वरात चालते. त्यानंतर मोठ्या दिमाखात लग्न सोहळा होतो. जमलेल्या सर्व मंडळींना भोजन दिले जाते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार


Previous Post

तळेगाव दाभाडे : ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत विविध कार्यक्रमांसह शिक्षक दिन उत्साहात साजरा

Next Post

ग्रामस्थांच्या बेमुदत उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग ; तळेगाव एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Local Villagers are aggressive in demanding connecting road in Talegaon Dabhade MIDC area

ग्रामस्थांच्या बेमुदत उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग ; तळेगाव एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.