महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांनी बुधवारी (22 मार्च) पक्षाच्या शिवाजीपार्क येथील जाहीर मेळाव्यात, माहिम येथील दर्गाह चा विषय मांडला होता. तसेच मागील दोन वर्षांपासून अनधिकृतरित्या इथे दर्गाह ( मजार ) उभा राहत असून शिंदे-फडणवीस सरकारने एका महिन्याच्या आत यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ( After Raj Thackeray warning encroached site of dargah in Mumbai Mahim demolished )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज ठाकरे यांच्या कालच्या इशाऱ्यानंतर आज (23 मार्च) सकाळीच तातडीने यावर कारवाई करण्यात आली. माहिममधील अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झाली. खाडीतील मजारच्या जागेवरचा हिरवा झेंडा ही हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला.
माहिममधल्या या अनधिकृत दर्गाहवर बोलताना राज ठाकरे आक्रमक झाले होते. ‘दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही, तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार’, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला होता.
मनसे इम्पॅक्ट pic.twitter.com/owStAWqaDI
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 23, 2023
त्यानंतर हालचालींना वेग आला होता. पोलिसांनी या ठिकाणाची पाहणी रात्री केली तर जिल्हाधिकाऱ्यांनी ती हटविण्याचे तातडीने आदेश दिले. त्याप्रमाणे सकाळी 8 वाजताच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस असा मोठा ताफा माहीमच्या त्या मजारीपाशी पोहोचले. अर्ध्या तासातच हा सगळा परिसर अनधिकृत बांधकाम मुक्त करण्यात आला. या परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
हेही वाचा –
– पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश
– नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट, मोदींनी दिले ‘हे’ आश्वासन