आंबी येथील डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मधील पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयातील 2008- 2012 सालात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शितल हॉटेल तळेगाव येथे पार पडला. त्या वेळी शिकणारे एकूण 28 विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक हेमंत कुमार डुंबरे हे होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. महाविद्यालयाच्या काळामध्ये ही सर्व मुले खुप कष्ट घ्यायची त्याचीच फळे त्यांना मिळत आहे. गेट-टुगेदर केल्याने आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये एकत्र राहून कायम एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका ठेवावी,” असे विचार महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक श्री हेमंतकुमार डुंबरे व सध्या केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे मास्टर ट्रेनर यांनी व्यक्त केले. ( Agriculture College Aambi students of 2008 batch get together held at talegaon dabhade )
कार्यक्रमात दिवंगत झालेल्या सहकाऱ्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मुले व मुली यांच्या चेहऱ्यावर खुप आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश थोरात, निकिता गांजाळे – चिंचवडे आणि मनीषा चोरमले- शेंडगे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्या सालातले माझी विद्यार्थी ज्ञानेश थोरात व आभार प्रदर्शन अभिमन्यू इंदोरे यांनी केले.
अधिक वाचा –
– काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News
– वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण । Vadgaon Maval