व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Department of Agriculture Fertilizers

Photo Courtesy : Team Dainik Maval


चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. ( Agriculture department urges farmers to use alternative fertilizers instead of relying on DAP Kharif season )

डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपी खतास चांगला पर्याय आहे.

एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याचबरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.

अधिक वाचा –
– तळेगावच्या ‘वैष्णव’ची एकाचवेळी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी । Talegaon Dabhade
– वडगावात दिसले एकीचे बळ ! सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनाने प्रशासन खडबडून जागे, उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू । Vadgaon Maval Accident
– ‘लोकसभेतील पराभवाने खचून न जाता पुन्हा ताकदीने मैदानात उतरू’, लोणावळा येथील बैठकीत ‘वंचित’चा निर्धार । Lonavala News


Previous Post

थरारक ! तळेगाव दाभाडे शहरात हवेत गोळीबार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण । Talegaon Dabhade

Next Post

मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी वाचा एका क्लिकवर । List of All Tourist Places In Maval Taluka

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tourist-Places-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी वाचा एका क्लिकवर । List of All Tourist Places In Maval Taluka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.