केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे रविवारी (6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आले होते. केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त अमित शहा आणि महाराष्ट्राचे दिग्गज नेते एकाच मंचावर आले होते. यावेळची एक खास गोष्ट म्हणजे अमित शहा आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. यावेळी अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं. ( ajit dada you have come to the right place said amit shah were both present at same forum in pune city )
‘अजितदादा आता तुम्ही योग्या ठिकाणी बसला आहात’
आपल्या मनोगतात अजित पवार ह्यांच्याबाबत बोलताना अमित शहा म्हणाले की, “अजितदादा पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी सांगू इच्छितो की, अजितदादा, आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. पण, तुम्ही याठिकाणी बसण्यासाठी थोडा उशीरच केला”, असं वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आणि सभागृहात टाळ्या वाजल्या.
अमित शहा यांच्या सहकार विभागाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. अमित शहा म्हणाले, ‘अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा , आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात’.
अमित शहा पुढे म्हणाले, ‘सहकार विभागाच्या माध्यमातून पोर्टल आपण आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेच संकल्प घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात 60 कोटींहून अधिक गरीब लोकांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मदत केली आहे. गरीबांच्या इच्छा गेल्या 70 वर्षात पूर्ण झाल्या नव्हत्या. पण पंतप्रधान मोदी यांनी 9 वर्षांच्या कालावधीत सगळं काम करून टाकलं आहे. गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा मोदींनी पूर्ण केल्या आहेत,” असे अमित शहा यावेळी म्हणाले. ( ajit dada you have come to the right place said amit shah were both present at same forum in pune city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
– राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road