Dainik Maval News : राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर करीत आहे. मंगळवार, अर्थात 22 जून पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असल्याने प्रत्येक इच्छुक उमेदवार देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत. रविवारी (दि. 20) भाजपाने आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची सोबत महाविकासआघाडीची पहिली यादी केव्हा जाहीर, होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात सोमवारी अजित पवार यांनी उमेदवारी यादी जाहीर न करता १७ उमेदवारांना थेट AB Form (एबी फॉर्म) वाटून टाकले. त्यामुळे अजित दादांचा पॅटर्न कुणाच्याही लक्षात येत नाहीये. त्यात आता अजित पवारांकडून उमेदवारीची पहिली यादी जाहीर होण्याची प्रतिक्षा असताना सोमवारी अजितदादांनी मात्र वेगळीच यादी जाहीर केली आहे.
अजित पवार यांनी सोमवारी (दि.21) आपल्या पक्षाच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 27 जणांची नावे आहेत. परंतु महत्वाची बाब म्हणजे पक्षाचा लोकप्रिय चेहरा असलेले मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे नाव मात्र या यादीतून वगळण्यात आलेले आहे. तसे पाहता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आमदार सुनिल शेळके हे पक्षाचे स्टार प्रचारक होते. त्यामुळे विधानसभेतही ते पक्षाचे स्टार प्रचारक असू शकतील अशी शक्यता होती. मात्र त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण झाले आहे.
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार,
राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..!विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत… pic.twitter.com/0ph5JqMhDG
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 21, 2024
आमदार शेळकेंना अद्याप एबी फॉर्म नाही…
भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मावळ विधानसभेचे नाव नाही. सोबत सोमवारी अजित पवार यांनी एबी फॉर्म वाटताना सुनिल शेळके यांना एबी फॉर्म दिलेला नाही. ( ही बातमी लिहित असे पर्यंत तरी एबी फॉर्म दिलेला नाही) त्यामुळे मावळ हा महायुतीत कळीचा मुद्दा असलेला मतदारसंघ असल्याचे सिद्ध झाले आहे. सोबत अजित पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर प्रचाराची धूरा न सोपविण्याचेही अनेक अर्थ निघतात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा
– राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत सुनिल शेळकेंचे नाव असणार, ‘या’ 6 कारणांमुळे अजितदादा शेळकेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देणार