मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांतून ग्रुप ग्रामपंचायत आजिवली येथील मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे आणि शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ( Ajivali Village Development Works Bhoomi Pujan by BJP Ravindra Bhegde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. महविकास आघाडीच्या काळात प्रलंबित असलेले कामे खऱ्या अर्थाने आता मार्गी लागणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी देतांना पक्ष पाहून निधीचे वाटप होत असे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. परंतु आता सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असल्याने विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे तालुक्यातील खोळंबलेले विकास कामे मार्गी लागणार आहेत,” असे मनोगत यावेळी रविंद्र भेगडे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी पं.स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, युवा नेते नितीन घोटकूले, नारायण बोडके, शत्रुघ्न धनवे, गणेश ठाकर, अभिमन्यू शिंदे, सरपंच नितीन लायगुडे, मा उपसरपंच संतोष भिकोले, माऊली ठाकर, सचिन शिंदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– चालकाची मस्ती, टेम्पोची घाटात कुस्ती..! हाईट बॅरिकेडमधून टेम्पो घुसवण्याचा आगाऊपणा चालकाला नडला
– शरद पवार यांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांसमोरच घोषणा