मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यात सर्व ठिकाणचे नगर प्रशासन जागे झाले आहेत. आपापल्या हद्दीत अनधिकृत होर्डिंग्ज नाहीत ना, असतील तर त्यावर कारवाई करण्याची सुरुवात आता प्रशासनाने केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून देखील शहरातील सर्व होर्डिंग बाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये शहरातील सर्व होर्डिंग अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले, अशी प्राथमिक माहिती समजत आहे. ( All hoardings in Talegaon Dabhade city limits unauthorized? Talegaon Dabhade news )
गतवर्षी तळेगाव दाभाडे हद्दीत सर्व एकूण 27 होर्डिंग अनधिकृत होते. त्यातील फक्त 5 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून बाकी सर्व विनापरवानगी कायम त्याच जागेवर स्थिर आहेत. यावर्षी त्यात आणखीन 3 अनधिकृत होर्डिंगची वाढ झाल्याने निदर्शनास आले आहे.
काही होर्डिंगच्या मालकांनी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केले होते. त्यात अर्जातील कागदपत्रांच्या त्रुटीची पूर्तता मालकांकडून न झाल्याने तळेगावातील 100 टक्के होर्डिंग अनधिकृत असल्याचे नगर रचना विभागाच्या प्रशासनाने सांगितले.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीत पीएमपीएमएल प्रशासन मालामाल ! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा । Pune PMPML
– घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर देहू नगरपंचायत प्रशासनाला जाग, 24 तासात अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सुचना
– सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक, विभागांनी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश