राज्यात आजही अनेक गावातील सरपंच हे फक्त नामधारी किंवा कळसुत्री बाहुले असल्यासारखे दिसतात. परंतू पुण्याच्या मावळ तालुक्यातील ओझर्डे गावचे सरपंच यांच्याकडे पाहून एखाद्या गावचा सरपंच हा विविध कलागुणसंपन्न देखील असू शकतो ह्याची सर्वांना खात्री पटलीये. मावळ तालुक्यातील ओझर्डे गावचे सरपंच बाळासाहेब पारखी यांची ऑल इंडिया रायफल्स स्पर्धेत 50 मीटर प्रोन रायफल सीनियर गटामध्ये 600 पैकी 574 गुण संपादन करून देशात सातवा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळावला आहे. त्यांच्या ह्या उज्वल यशाबद्दल सर्वबाजूंनी त्यांचे कौतूक होत आहे.
बाळासाहेब पारखी हे लोणावळा शूटिंग क्लबचे सदस्य आहेत. त्यांनी इंदौर (राज्य – मध्यप्रदेश) इथे झालेल्या ऑलइंडिया जी. व्ही. मालवणकर रायफल शूटिंग स्पर्धेत 50 मीटर प्रोन रायफलमध्ये 600 पैकी 574 गुण मिळवले. त्यांचा देशात सातवा आणि राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. नेमबाज बाळासाहेब पारखी हे ओझर्डे गावचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्या यशाबद्दल ए.सी.पी. पद्माकर घनवट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
बाळासाहेब पारखी यांच्यासह अतुल वाडे यांनी 600 पैकी 582 गुण मिळवून सुवर्णपदक, कृष्णा शेळके यांनी 481 मिळवून रौप्यपदक, नवनीत ठाकूर 600 पैकी 462 अशी कामगिरी केली. बाळासाहेब पारखी यांना प्रशिक्षक स्नेहल राज दाभाडे, राज दाभाडे, दर्शन लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. ( All India Rifles Competition Balasaheb Parkhi Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! ‘छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढताना वापरलेली वाघनखे लवकरच भारतात आणणार’
– प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल! राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची टीका
– मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय