महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक संपली आहे. त्यानंतर अमित शाहा यांनी माध्यमांसोबत संवाद साधला, यावेळी त्यांनी बैठकीतील चर्चा आणि संवाद याबाबत माहिती दिली. ( Amit Shah Meets Karnataka And Maharashtra Chief Ministers On Both State Border Dispute Temporary Solution Worked Out )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले अमित शहा ?
“दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोवर कोणतेही राज्य संबंधित जागांवर दावा सांगणार नाही. दोन्ही राज्यातील सहा मंत्र्यांची (प्रत्येकी तीन-तीन) मिळून समिती स्थापन करण्याची शिफारस. दोन्ही राज्यांवरील सीमा भागात शांतता रहावी. दोन्ही राज्यातील सीमाभागात कायदा सुव्यवस्थता रहावी, यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाईल. फेक ट्वीटर च्या माध्यमातून सीमावाद भडकवण्यात आला असून त्याविरोधात तक्रार नोंदवली जाईल. विरोधकांनीही यात राजकारण करु नये”, असे शहा म्हणाले. ( maharashtra karnataka border dispute )
अधिक वाचा –
– बाळा भेगडे, अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत विविध लोकसभा मतदारसंघांतील पक्षाच्या कार्यक्रमांची आखणी
– आरटीओ अधिकाऱ्यांचे, एक पाऊल पुढे! सहलीला निघालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची बसमध्येच घेतली ‘शाळा’