“ऑगस्ट 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन’ हा भरगच्च कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 18 रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण ,नवीन नवीन सुविधा, स्वच्छ रेल्वे स्थानके, पाण्याची व्यवस्था, स्वच्छ उपहारगृहे, यात्रेकरुंसाठी प्रतिक्षालये, फुलबागा, सरकते जीने, इंडिकेटर्स अशा सर्व सुखसोई रेल्वे प्रवाशांना देण्यात येणार आहेत, अशी मोठी जाहीरातबाजी झाली. हे सर्व झाले तर चांगलेच आहे. सर्वांना हवे आहे.
परंतु आता गेले ६-७ महिन्यांपासून ‘तळेगाव’ रेल्वे स्थानकाची दुरावस्था आहे. सर्व platforms अर्धवट काम केल्याच्या स्थितीत आहेत. प्रवाशांना चालायला धड जागा नाही. तिकीट काढायला जायचे म्हणजे एक दिव्यच आहे. नवीन प्रवेशद्वार बनविणार म्हणून तेथून प्रवाशांना जीव धोक्यात टाकून चालावे लागते, सगळीकडे वायर्स, तारा लोंबकळत आहेत. केव्हा कुणाच्या डोक्यात काय पडेल याचा नेम नाही. पुष्कळ वेळा स्थानकात वीजच नसते. फक्त तिकीट आॕफिसमध्ये वीज असते.
फलाट एकच्या बाहेर अगदी चिंचोळी वाट आहे. तिथेच मोठमोठे जाड पत्रे टाकून ठेवलेले आहेत, त्यात पाय अडकून कितीतरी प्रवासी पडतात व जखमी होतात. तिथेच एक ATM आहे. परंतु त्यातसुध्दा वीज नाही. जनता आपल्या mobile मधील battery लावतात व काम करुन घेतात पण ते धोक्याचे आहे. सर्व सावळा गोंधळ आहे. कामाचे योग्य नियोजन नाहीये. संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष देऊन कामाचा निपटारा करावा.”
दैनिक मावळ वाचक –
प्रकाश वा. दातार
तळेगाव दाभाडे
अधिक वाचा –
– शनिवारी आणि रविवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, नाहीतर मनस्ताप होईल
– ‘खासदार आम जनतेचा’ .. ‘विजय निश्चित’ .. ‘घासून नाय ठासून..’ मावळ लोकसभेत निकालाआधीच झळकले संजोग वाघेरे यांच्या विजयाचे बॅनर
– सीबीएसई बोर्ड परीक्षेत तळेगावमधील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल ! सार्थक भांडवलकर प्रथम