मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगांव दाभाडे या रेल्वे स्टेशनवरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना आधुनिक, अद्ययावत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी 40 कोटी 35 लाख, आकुर्डी रेल्वे स्थानकासाठी 33 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ( Amrit Bharat Station Scheme Talegaon and Akurdi Railway Stations Will Be Transformed )
देशातील रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली आहे. यातून रेल्वे स्थानकावर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करुन दिले जाणार असून रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत भारत योजनेअंतर्गत तळेगांव दाभाडे रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. या कामाच्या प्रस्तावित आराखड्याची भारतीय रेल्वे खात्याच्या वतीने छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत भारत योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाच्या प्रस्तावित आराखड्याची भारतीय रेल्वे खात्याच्या वतीने छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहे.
हेही वाचा – तळेगाव दाभाडे, देहूरोड, आकुर्डी, चिंचवड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी भूमिपूजन
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; तळेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
– पुण्यात 6 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिर; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे गरजू रुग्णांवर होणार उपचार
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road