मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज ( रविवार, 26 मार्च) सकाळी सोमाटणे फाटा जवळ एका ट्रकचा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक क्रमांक MH50N9970 रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आला. वाहन चालकाच्या सांगण्यानुसार सकाळी साडेपाच वाजता अचानक ब्रेक दाबल्यामुळे तो रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले रेलिंग तोडून पलटला.
सदर अपघातात चालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. या वाहनात वाहनांमध्ये साखरेची पोती भरलेली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस यंत्रणा आणि RTO पथक त्या ठिकाणी दाखल झाले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळ्याजवळ अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक लेनवर पलटी
– स्तुत्य उपक्रम..! मुक्या प्राणीपक्षांची तहान भागवण्यासाठी फ्री वॉटर बाऊलचे वितरण