पुणे येथील नऱ्हे मध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा शिवदुर्ग फिटनेस क्लब च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले आहे. महत्वाचे म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेत कुमारी तपस्या अशोक मते हिला सलग दुसऱ्या वर्षी स्ट्राँग वुमेन ऑफ महाराष्ट्र हा बहुमान मिळाला आहे. हे सर्व खेळाडू राष्ट्रीय पंच आणि फिटनेस क्लबचे अध्यक्ष अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. ( Students of Shivdurg Fitness Club Lonavala success in state level powerlifting competition at Narhe Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 10 ते 12 मार्च या दरम्यान समृद्धी लाॅन्स नऱ्हे (पुणे) इथे ही स्पर्धा पार पडली. राज्य स्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर आणि मास्टर्स अशा गटांसाठी पॉवरलिफ्टिंग स्पर्धा झाली. यात शिवदुर्ग फिटनेस च्या स्पर्धकांनी मिळवलेले यश खालीलप्रमाणे;
तपस्या मते – सुवर्णपदक
खुषी बडे – सुवर्णपदक
रबिहा पाटका – रौप्य पदक
ज्योती कंधारे – रौप्यपदक
सुनील सपकाळ – सुवर्णपदक
युगंधरा औसरमल यांनी देखील उत्तम कामगिरी करत चतुर्थ क्रमांक मिळवला. तर तपस्या अशोक मते हिने सलग दुसऱ्या वर्षी स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र हा बहुमान मिळवला.
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम..! मुक्या प्राणीपक्षांची तहान भागवण्यासाठी फ्री वॉटर बाऊलचे वितरण
– धक्कादायक! लोणावळ्यात तीन अल्पवयीन मुलांकडून शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला