मावळ तालुक्यातील वलवण गावात सध्या तलावातील गाळ काढणे आणि इतर कामे सुरु आहेत. हीच कामे सुरु असताना शुक्रवार (दिनांक 10 मार्च) रोजी तलावातील गाळात दोन मोठी कासवे सापडली. वनखाते, लोणावळा नगरपालिका आणि शिवदुर्ग मित्र टीमने वलवण येथील धरणात सोडून या कासवांना जीवदान दिले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गोड्या पाण्यातील कासव Sweet Water Turtle या जातीच्या सुमारे 19 इंच व 16 इंच इतकी मोठी ही कासवे होती. यांचे आयुष्यमान 150 वर्षांपेक्षा जास्त असते. त्यामुळे यांचा आकार चांगला मोठा होतो. आदित्य पाळेकर, ओंकार पाळेकर, सुनिल पाळेकर यांच्या कामगारांना ही दोन्ही कासवे सापडली होती. ( Life Give To Turtles At Valvan Dam From Shivdurg Mitra Lonavala )
वनखात्याचे संदीप रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा नगरपालिकेचे विजय साळवे, शिवदुर्ग मित्र, लोणावळाचे सुनिल गायकवाड, राजेंद्र कडु, अमोल सुतार, कपिल दळवी , सचिन तारे , टाटांचे सुरक्षा अधिकारी सतिष सगर यांनी दोन्ही कासवे सुरक्षीत धरणाच्या पाण्यात सोडून दिली.
अधिक वाचा –
– जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन
– स्तुत्य उपक्रम! ओव्हळे गावात महिलांसाठी कम्युनिटी हॉलचे उद्घाटन; डोणे गावात दूध शीतकरण केंद्राचे लोकार्पण