Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. गहुंजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता पोक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात पालकांनी मतदान करावे, यासाठी प्रोत्साहनपर मतदानाची घोषवाक्ये असलेली भेटकार्ड तयारी केली होती. ही भेटकार्ड नागरिकांना वाटून त्यांच्यात मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.
देहूरोड येथे मतदान जनजागृती मोहीम –
मावळ विधानसभेत कमी मतदान होत असलेल्या मतदान केंद्रावर मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार देहूरोड परिसरामध्ये ज्येष्ठ नागरीक कट्टा, बँक, रिक्षा प्रवासी, भाजी मंडई आदी सार्वजनिक ठिकाणी शिक्षकांनी जाऊन ‘ताई माई मतदानाला चला’ या संकल्पनेतून मतदारांमध्ये जनजागृती केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई